पान:इंदिरा.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० ऐशी ही कृति ना परी मुळिंच ये कामास या मंडळीं, ओढाताण करोनि नारिरव तो या आणिलासे गळीं; प्राथू या नटनायका, कधिं न हीं सोंगे कळावीं स्त्रियां, स्त्रीवेषी बसुनी तयांमधिं सदा प्रेक्षीतसावें तयां. १९७ दिंडी. पुरी होतां ही उक्ति त्या शशीची, वेळ झाली मध्यान्ह भोजनाची; भोजनाच्या मंडपीं येउनीयां जागिं बसली एकैक आपुलीया. १९८ तिथहि एक्या स्थळं बैसलें त्रिकूट; नाहिं झाली कधिं-होइ कशी ? - फूट; दाट शोभे तो थाट स्त्रीजनाचा, रंग पाटांचा ताट-वाटियांचा. १९९ अन्नदात्याला प्रार्थनी मुखानें, एकघोष मांगल्य गीतगानें, देवि तोषविली, अन्न सेवियेलें, षड्रसानें रसनेस तुष्ट केलें. २०० साक्या. भोजनसमयीं शशीकलेचे त्रिकुटावरति कटाक्ष दिसोनि आले, परी त्रिवर्गे केलें तिथ दुर्लक्ष; जणुं का सिंहिण ती, । रानीं पाडस निरखीती. २०१ भोजन झालें; तांबूल मुखीं सेवुनि फिरण्या जाती; कोणी उपवनिं, वनिं हिंडूनी पाठांतर करिताती; ऐसें मंडळ तें । हर्षित क्रीडा सुखि करितें. २०२ १ स्त्रियांचा आवाज.