पान:इंदिरा.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

“धिक्कार मूर्खा तव वल्गनांतें !” संतप्त बोले कमलाक्ष त्यातें; “त्वज्ज्ञान वृद्धीस न पावलें का, व्याख्यान हें ऐकुन आजि लेंका?” १९१ "कसा 'नाहीं' बोलुं” - शशिवदन बोले- "वद भलें ? अरे व्याख्यानातें परिसुनि खरें ज्ञान दुणलें; निमेषामाजी मी सकळ शिकलों जें कमलजे- सुखावाटे, तें ना युगिंहि शिकतों, पूर्ण उमजें. १९२ प्रसिद्धां शास्त्रांचें परम अजि तें दैवत जरी शिरीं माझ्या ओती प्रिय निजकरें शास्त्रहि, तरी मला वाटेना की मजशिं मिळतें ज्ञान इतुकें; कधीं लाभे कोणा, परिसुनि मिळे आजि जितुकें ? १९३ परी बघ इथे किती, सुहृदयें कशीं कोमळ, अशा अवनिं राहुनी नगरिं या कुबुद्धीमळ पदोपदिं हळूहळू करिति नित्य तीं सेवन; अभाव नरमैत्रिचा बहुत दूषितो स्त्रीजन. १९४ अरे उपजला असे बहुत लोभ माझ्या मनीं, दिसे न दुजि सुंदरी प्रिय अशी मला या जनीं, गमे वरुनियां तिला, सकळ सौख्य संसारिंचें निवांत उपभोगितों, परि न लग्न येथें रुचे. १९५ किती सुरमणीय या दिसति ज्ञानभोक्त्या स्त्रिया ! किती सुगुरुमाथि • मनविहारि शिष्यप्रिया ! कितीक समयीं मला नटवि थाट हा वाटला अयोग्य ! गमलें स्त्रियां पुरुष दाखवावा भला ! १९६