पान:इंदिरा.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अथवा बरोबर इंदिरेंतील संगीत पधें तालसुरावर मीं गाऊन बसविलीं आहेत, त्या गवयांची नांवें येणेंप्रमाणेः- (१) गोपाल- सिंग बालाराम. हे मध्य हिंदुस्थानांतील माळवा प्रांतांतील रजपूत हे रहिवासी. यांच्या बरोबर यांचे दोन मुलगे भाऊसिंग, उमर वर्षे १६ आणि नानासिंग, उमर वर्षे १३ हे गावयास असतात. नानाचा आवाज कोमळ व फारच गोड आहे. गोपालसिंगा " वस्ताद" हुसेनखान हे होत; हल्लीं त्यांची उमर वर्षे ७० आहे. ते माळव्यांतील जावरा संस्थानाचे अधिपती नबाब महंमद इस्मायेलखान वाहादूर फिरोझजंग यांच्या तैनातींत आहेत, व त्यांचा गाण्याचा क्रम अझून चालू आहे. गोपालसिंगाची गा- याची तऱ्हा मर्दानी. जावरा संस्थानास “गुलशनाबाद" असेंही नांव आहे. (२) रामदुर्गचे सखाराम बळवंतराव केतकर. बापलैंक उभयतां गाण्यांत निष्णात आहेत. बळवंतराव केतकर यांनीं आज पंधरा वर्षे “खरज" सुराचा अभ्यास करून सर्व उत्तर दक्षिण हिंदुस्थानभर - बनारसपासून तो म्हैसूरपर्यंत- आपलें नांव गाजविलें आहे; इतकेंच नाहीं, तर गायनकलेला नवें स्वरूप दिलें आहे. “खरज” सुर सहसा साध्य नाहीं. ज्या गवयानें हा सूर साध्य करून घेतला, तो सामान्य गवई नव्हे. बळवंत - रावांची माझी ओळख नाहीं; ही माहिती माझे मित्र राव- बाहादूर कृष्णाजी बल्लाळ देवल यांजपासून मिळाली; ती येथें देतो. बळवंतरावांच्या चिरंजिवांसमोर किंवा बरोबर ह्मणा, इंदिरेंतील बहुतेक संगीत पधें गाइलीं आहेत. (३) सांवत- वाडीकर बीन वाजविणारे प्रसिद्ध लक्ष्मणराव पोंक्षे-ऊर्फ दांडे- कर- यांच्याही समोर इंदिरेंतील संगीत पधें होतां होईल तितका यत्न करून आहेत. मुख्य श्रेय गोपाळराव खारकरांचें. गाइलीं आहेत.संगीत पधेंगायनशुद्ध केलीं शब्द माझे, विचार