पान:इंदिरा.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



साचा:'''center विष्णुपंतांच्या मार्मिक लेखांचा इंदिरा काव्याच्या दुसऱ्या आवृत्तीला विशेष तेज आणण्याचे कामी पुष्कळ उपयोग झाला. त्यांच्या मार्मिक लेखांमुळें तेज आलेलीं जीं नवीं पद्ये या दुसऱ्या आवृत्तींत मीं घातली आहेत, त्यांचें श्रेय त्यांसच दिलें पाहिजे. नवीन पद्यांत प्रसंगी त्यांचेच शब्द माझ्या अल्पमतीनें मीं योजिले आहेत.?

(२) मासिक विविधज्ञानविस्तारांत " पुस्तकपरीक्षा " या सदराखालीं इंदिरा काव्याच्या संबंधानें सतराव्या पुस्तकांत ( एप्रिलपासून जुलै १८८५ अखेर ) जे निनांची लेख प्रसिद्ध झाले, ते माझे कै० वा० मित्र रा० रा० वामन दाजी ओक यांचे होते, हें मला ते लेख प्रसिद्ध होत असतांनाच कळून आलें होतें. त्यांच्या परीक्षणानें माझ्या या दुसऱ्या आवृत्तीला बराच फायदा झाला आहे.

(३) इंदिरेच्या पहिल्या आवृत्तींतसंगीत पधें घातलीं होतीं, त्यांत जेथें जेथें संगीतशास्त्राचा अतिक्रम माझेकडून झाला होता, तो माझे गायनकलापटु मित्र गोपाळराव विनायक खारकर यांनीं इंदिरेची पहिली आवृत्ति प्रसिद्ध होतांच, पहिल्यानेंच माझे नजरेस आणला, व नव्या चालीवर तीं तीं पद्ये गाण्याचा मार्गही दाखविला; त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहें.

 पहिल्या आवृत्तींत ज्या साक्या मीं घातल्या होत्या, त्या गायनशुद्ध दिसल्या नाहींत; ह्मणून त्या सगळ्या साक्या धारवाडकर गायनशिक्षक रामचंद्र सखाम बापट यांजबरोबर गाऊन गायन- शुद्ध केल्या आहेत. इंदिरा छापत असतांना रत्नागिरीस या वर्षाच्या आरंभापासून आजपर्यंत पुढील तीन गवयांच्या समोर