पान:इंदिरा.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझे; त्यांची गायनपर योजना ठरविणें काम गोपाळरावांचें. चूक असेल तर माझी. गायन मला अत्यंत प्रिय आहे. गवयांबरोबर गाऊं शकतों, पण कोठें कोठें ढांसळतों-असो. प्रसंगीं लिमये बुवांनींही मजबरोबर गाऊन, इतर संगीत पधें शुद्ध केलीं आहेत. उत्तर हिंदुस्थानांतला उत्तम गवईही आज माझ्या तैनातीत आहे, इंदिरेंतील पधें रागरागिणींवर माझ्या बरोबर गाऊन मला दाखवीत आहे.
 शेवटीं – माझ्या मित्रवर्गात मुकुटमणी वे० शा० संपन्न राजाराम रामकृष्ण शास्त्री भागवत यांजकडून ही दुसरी आवृत्ति प्रसिद्ध करण्यांत जें साह्य झालें आहे, त्याबद्दल त्यांचें आभार मानीन तितके थोडेच.


वटपूर्णिमा, शके १८२३. ता. २ जून इ. स. १९०१. • कान्होबा रणछोडदास कीर्तिकर.