पान:इंदिरा.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ तिघे वृषभ गोठियांतुन सुटोनि रात्रौ जसे फिरोनि कुरणीं, तृणें भरिति पोट स्वच्छंदसे, तिघेहि तसियेपरी, फिरुनि पाठशाळेमधीं यथेच्छ उपभोगिती विविध भोग ज्ञानांबुधीं. १८७ दिंडी. चंद्रकेतु वदे तदा तो - "बघा ! या काम चालविती स्वयें सर्व बाया पूर्ण ज्ञानें, चतुराइनें, सुनीती, बहू प्रेमानें, नरांचिये रीती!” १८८ साकी. शशिवदनानें उत्तर केलें ऐका राजसुताला- "स्थापिलि शाळा काय त्यामधीं पुरुषार्थचि तो झाला? नाहीं का बाया । शिकविति बाळां गृहिं आया ? १८९ श्लोक. उच्छिष्ट पात्रें असती स्त्रिया या; शक्ती नसे शोध नवे कराया; केलें कुणीं कांहिं तया विधानें, तें त्यां करूं ये बहु शिक्षणानें." १९० १ स्त्रिया "उष्टया पत्रावळी" अशी मुंबईकरांत ह्मण आहे; ह्मणजे त्यांच्यांत आपण होऊन कांहीं नवी कल्पना काढण्याचें सामर्थ्य नाहीं; तर, कोणी पुरुषांनीं कांहीं केलें तसें याचे अनुकरण मात्र करण्याचें काय तें सामर्थ्य आहे; अर्थात् हे वाक्य परम निंदास्पद आहे असे समजावयाचें.