पान:इंदिरा.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारतांतील वाचूनि वेंचे, स्फुट लोक बोधार्थ रामायणाचे, तसे लोक ते रामदासी 'मनाचे' करीती मनोरंजन स्त्रीजनांचें. १८१ समयसूचक तोषक ज्या ह्मणी, चतुर योजिति नित्य सुभाषणीं, वदुनियां कथि त्यांतिल मर्म तें, सुगम जें गमलें तिचिया मतें. १८२ राजनीति, इतिहास पुरातन, तर्क, कालगणना, भववर्णन, तत्त्व, ज्योतिष, छंद, निरुक्तही, न्याय, दाय, कथि चालत जैं मही. १८३ खग नग तरु पुष्पें वाढती कोण रीती, जलचर पशु यांतें कोण कैशापरी ती गति जननमृतीची, वर्णि ती सर्व साची; परिसुनि युवतींच्या तृप्ति होई मनाची. १८४ विद्युत्प्रयोग करुनी मग दावियेले; केल्या रसायनकृती तयिं दंग डोले सारी सभा युवतिंची, बघुनी जगींच्या आल्हाददायक चमत्कृति सर्व साच्या. १८५ जें जें शास्त्र असे सुगम्य मनुजां तें तें तिथे पाहिलें; जें कांहीं उपलब्ध आजिवरि, त्या ज्ञाना तिथें वाहिलें प्रत्येकीं मन आपुलें युवतिंनीं प्रेमें पुज्य आर्तिनें; पाहोनी नर हें तिघेही रमले, तैं थक्क झालीं मनें. १८६