पान:इंदिरा.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिंडी. “बरें !" ऐसें मग कमलजा ह्मणाली, गोष्टिखालीं अशि फार वेळ गेली- "नीट वागा हो, थाट शोभवा तो, सिद्धि पावेना अन्य मार्गि हेतो. १७५ श्लोक. माझी आहे हीच तुझांस सांगी, बोला थोडें; फारशा एक जागीं कोणासंगें बोलुं तुझी नका हो; जेथें जेथें जाल तैं ऐक्य राहो." १७६ निघाले जायातें, तयिं शशि वळोनी उचलुनी सुता घेई प्रेमें कटिं, कमलजेची कवळुनी; धरी कीं बाहूशीं परमसुकुमारा कुमरिला, रमोनी बाळेनें हंसत शशिचा गाल धरिला. १७७ चुंबिलें सुमुख मंजुळिचें तदा, चुंबिल्याविण अशा सुमुखा कदा पुरुष राहिल कोण, कसा तरी ? चुंबुनी तिज, विनोद बहू करी. १७८ तिघेजण तिथोन ते परतुनी निघाले सवें; दुपारभर हिंडले ठिकठिकाण, प्रकार बघतां तयां बहुत हर्ष झाला मनीं; बसोनि बहु विस्मयें पठण देखती स्त्रीजनीं. १७९ ऐका तिथें शिक्षण केविं देती; भूगोल गोलांवर शीकवीती, वर्तूळ रेषाकृति भूमितीच्या, शिष्यांप्रती दाविति रीति साच्या. १८०