पान:इंदिरा.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नसे इच्छा माझ्या मुळिंच हृदयीं वा मम मनीं असें कीं धाडावे नरवर तिघे मृत्युसदनीं; अहो या वीरश्रीविजयभरल्यां दिव्य मनुजां कसें तें हाणावें ? निजबळ असें कोठिल भुजां?” १६९ वदे तैं ती बाळेप्रति कमलजा- "हे प्रियसखे ! जरी ऐशी वाणी नसति ग निघाली तव मुखें, तरी भीती कांहीं हृदयिं नव्हती, वा कधिं नये; तुझे ठायीं आहे परम मम विश्वास सखये. १७० परि तव मज वाटे, मत्सरी द्वाड माता- ह्मणत अजि ग होत्यें-फार का बोलुं आतां-. दिसशि सकल कामीं शाहणी नित्य जी तूं, 'ब्र' न कधिं मुर्खि काढीं, जाय तैं सिद्धि हेतू.” १७१ बोलतसे-“चकार न मुखें येणार, हे शाश्वती ! कोणा वर्म न ही कथील रसना, काया असे जों जिती; आला भूवरि ब्रह्मदेव जरि तो, जिव्हामिं ती शारदा, वाणी ना निघणार जी वदलिया होई जनीं दुःखदा”.१७२ बाला कमलजा तदा बोलली तिला- "प्रभु समर्थ हो साह्य तो तुला ! सुचवुं संकटीं योग्य बुद्धिला; सकल कार्य हें जाउ सिद्धिला !” १७३ “नको गे तूं आतां” शशिवदन बोले कमलजे "नको आह्मां त्यागूं, पुरुषगण आह्मी निरत जे स्त्रियांठायीं आहों; कळत मुळिं ना, स्त्रीजन जरी मनुष्यां अव्हेरी, घडुनि कशि येई गत तरी.” १७४