पान:इंदिरा.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ एक्या ढाळिं गुलाब दोन फुलतां, सान्निध्य पावोनियां त्यांच्यांतील सुसूक्ष्म भेद न कळे जैसा बधोनी तयां, तैशीं सन्निध पाहतां, दिसति तीं तैं एकमेकांसम; हा भ्राता ! भगिनी किं ही ! न समजे, ऐसा पंडे तैं भ्रम ! १९६३ आनंदाश्रू नयनिं भरुनी प्रेम-मूर्ती गळाले; ऐकोनी ती स्वगृह-कुशळ-क्षेम, संतुष्ट डोले; बंधुप्राणाऽपहरणवती बुद्धि सारी पळाली; ब्रीदद्रोही बनलि, तिचि सत्कार्यनिष्ठा गळाली. १६४ साकी. अशीं उभयतां बोलत असतां, एकमेक तीं प्रेमें, देखे तिथ ती, शशिकलेची तनया मधुकरि नामें. बाळा तिज बोले-। “माय निरोपास्तव आल्यें”. १६५ श्लोक. हंसत वदन जीचें, वेल जी कोंवळीशी, नयन विकच पुष्पें ते जिचे तेजराशी, मधुकरिअभिधाना शोभवी जी कुमारी, उभि तिथ सुकुमारा राहि आनंदकारी. १६६ (पुसे कमलजा तिला, “सकळ काय गे भाषण तुवां वद किं ऐकिलें ? तुज न देई मी दूषण"; | तदा मधुकरी वदे करुनि अंतरंगा खुलें, “युग्म.” “तुह्मां कथितसें खरें सकल भाषणा ऐकिलें;१६७ | मनांत नव्हतें, परी जयिं उभी इथे राहिल्यें |वचा भयद तूमच्या पडत, कर्णि या घेतलें; | क्षमा मज करावि हो, दिसतसें जरी आग्रही, (घडेल न कदापि कीं करिन गोष्ट षट्कर्णि ही. १६८