पान:इंदिरा.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न मत्स्वामीणीची शपथपर सेवा कधिं घडे, जरी भाऊ रक्षीं, सहचरहि जीवंत इकडे; अहा ! कर्त्तव्याला स्वजनममता बाध करिते ! मला नाहीं आतां सुचत, बघत्यें काय घडतें. १५८ “करूं या, " ह्मणे- “एक युक्ती क्षणीं या ! भल्या राजपुत्रा ! प्रिया बंधुराया ! कचाट्यांतुनी म्यां तुह्मां सोडवावें; तरी सांगत्यें, येथुनी शीघ्र जावें. १५९ पद. रागिणी कानडा, - ताल त्रिवट. ( ख्याल राजा दुलारे - या चालीवर . ) आज-उद्यां तुझिं येथुन जावें, मुकाल नातरि प्राणांतें; जाल किं नाहीं तुझी बांधवा सांगा साचें झणि मातें ॥ध्रु०॥ मंदमती त्या तिघही होत्या, येत्या ना कधीं कामातें, ऐसें सांगुन समजावूं त्या कांचननगरीमातेतें ॥ १ ॥ आज ० जा हो येथुनि, जीव वांचवा, आण घालित्यें तुह्मांतें, उठवूं वदतां पळोनि गेल्या तिधिही आपुल्या प्रामातें, ||२|| आज० १६०. श्लोक. द्यावें म्यां तुज मृत्युला भगिनिनें, बंधो! घडे का कदा ! देहाचें नसतांचि भान वदल्यें, वाणी अशी दुःखदा ! हे बंधो! गृहिंचें मला कुशळ रे तूं सांग आतां प्रिया, माता कैशिअसे, कथीं; मन करीं तूं शांत; टाकीं भया". १६१ दाटे तैं मन कोंवळें भगिनिचें, भ्रात्या निहाळी, मुखीं • प्रेमें नेत्र भरूनि अञ्ज गळले, होई मनीं ती सुखी; हातानें धरुनी तया मणगटा, आलिंगिलें बंधुला भेटाभेट दिसे किं शुक्र उदयीं भेटे नभीं इंदुला. १६२