पान:इंदिरा.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ श्लोक. [ हरिणि दिवशिं एका सायकें पीडिलेली पळत तुजशिं आली व्याकुळप्राण झाली; बघुनि रुधिर तीच्या अल्प जें अंगिं वाहे, | ढळढळ रडलीशी, दुःख जैं तें न साहे; १५२ ती आज कोमळ कशी स्वकरें प्रकोपी “विशे- | गर्वीध बंधुशरिरावर हस्त वोपी ? का बंधुची तनु तुला हरिणीहुनी ती वाटे उणी ? तरि असे अशि कोण नीती ? १५३ होतीस केविं मधुरा, बहु सुस्वभावा ! | नाहीं मला कळत कां अजि भेद व्हावा. वाग्बाण तीक्ष्ण बहु हे हृदयांतराला गेले तिच्या, परिसुनी कटु भाषणाला. १५४ साकी. "" मग शशिवदनें भाषण केलें ?-“का तूं त्या बाळेची माता असशी, बहु आवडती इथ जी सर्वत्रांची ?" तैं ती उत्तर दे, । प्रेमें गहिवरलेलि वदे - १५५ श्लोक. "जळो हा मायेचा भ्रमवित पसारा मृदु मना ! असे वेडी माया, बहु पिडितसे सद्गुणि जनां, स्वकर्त्तव्यालागीं कधिंहि तरि बाधा करितसे; वसे प्रेमा जेथें, कठिण मन होई तिथ कसें ! १५६ परी कां भ्यावें म्यां, सुकृत करण्यालागि अपुलें ? स्वमातेच्या हस्तें बलि न चिलया काय दिधलें ? स्वदेहींच्या पिंडाहुनि भगिनिला का प्रियतर असे भाऊ लोकीं ? उगिच मग कां मी भिउं तर ? १५७