पान:इंदिरा.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५१ बोले मग तो तिज शशिवदन-"प्राण जोंवरी देहीं, राहें तोंवरि तव चरणीं म्यां लेवुनि स्त्रीवस्त्रे हीं; नित्य इथ रहावें, । तव चातुर्या परिसावें !” १४७ श्लोक. राजपुत्र तैं वदत तीप्रती - "तूंच होसि का कमलजा ग ! ती, लग्न लागतां सजुन नोवरी, जावया जयीं निघशि सासरीं, १४८ "युग्म.". बोललीस जी मत्पित्या स्वयें, 'सोडिलें तुह्मां आजि निर्द म्यां जरी, तरी जाणिजे पुरें अंतरीं तुह्मां इच्छितें बरें'. १४९ बोललीस तैं-'तूमच्या कुणी गांवचें कुण्या वेळिं, कारणीं, संकटीं पडे गांविं माझिया, साह्य होई मी वेळिं त्या तया.' १५० साकी. स्मरुनी भाषण तेंच तुझें गे आलों तुझिया द्वारा, 'संकटिं पडलां' ह्मणशी ऐसें, तरि दे आह्मां थारा; आठविं गे उक्ती, । पुरवीं नृपतनयासक्ती. १५१