पान:इंदिरा.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० तदा नृपकुमार तो कमलजेस बोले-"अगे ! सुधी कमलजा प्रिया असशि तूंचि ती काय गे, जिचा मम पितामहा रणि पिता असे रक्षक; मशीं वळसि तूं जसा वळत दंशिण्या तक्षक ! १४१ तुझ्या कुळिंच काय ती सरलि पूज्य बुद्धी असे ? तुझ्या हृदयि तीळही उरलि काय प्रीती नसे ? कशा तरि अशी अगे! वदशि वैखरी दुःसह, जगास न रुचे असा मनिं धरूं नको आग्रह." १४२ बोलला पुढें बंधु तो तिला- "नाहिं आठवे काय गे तुला, एक ठायिं तीं कैशिं वाढलों? बाळकें सुखें कैशिं क्रीडलों ? १४३ एकमेक जीं दोन संगतीं खेळ खेळलों प्रेमिं नांदतीं, नाट सोंगट्या हास्यि आर्जवें खेळलों; कसें तूज नाठवे. १४४ ज्वरभरादिकें अंग शोषतां कधिं न भागली जीच कष्टतां, उभि असे खडी राहिली अजी वपु हरावया, प्राण-राखि जी ! १४५ साकी. कुरणि गारशा शांत सकाळीं बहु फिरलों आनंदें, वनीं उपवनीं गुंफुनि पुष्पें ल्यालों जीं स्वच्छंदें; तूं ती भगिनी का । अजि मज धाडिशि यमलोका?"१४६