पान:इंदिरा.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९ द्वारावरच्या लेखा सोज्ज्वळ पाहुनि कसे इथें शिरतां ? 'मारूं पुरुषां' ह्मणतों, प्राणा तुझि कां उगाचि अंतरतां. १३४ जा बंधो! मित्रांसह, तिज कळण्याआधिं शीघ्र पळ काढीं, आलां तैसे परता; पडतां काळाचिया फुका दाढीं! १३५ वर करण्यालागीं बा मानस नाहीं कदा तिचा होणें; जरि इच्छित न घडे हें, वाटे मातें प्रशस्त तुह्निं जाणें. १३६ श्लोक. बोले राजकुमार तैं, “गमतसे द्वारीं जरी तें लिहा- 'मारूं त्या पुरुषास जो इथ शिरे'-मानूं न हो लेख हा; प्राज्ञा काय असे जरी ह्मणतसां प्राणास घेऊं स्वयें ? वीरांशीं पडतांच गांठ समजे कीं त्यांशिं भांडूं नये. १३७ जैसा शेतकरी उभा करितसे शेतामधीं बाहुला, हालेना, न चले, न शक्ति करिंही, ना स्थैर्यही पावलां; राहे जोंवरि तो उभा, भिववि तैं ढोरां गुरां, पांखरां, भ्यावें भ्याडजनें तसें धमकिला, यावें न या मंदिरा! १३८ - आम्ही युद्ध करूं, न भ्याड जन गे मारूं किं युद्धीं मरूं, जिंकोनी कृतकृत्य होऊं जगिं या, की भांडतांना हरूं; कांहींही घडलें तथापि तुमचा विध्वंस होईल वो ! कार्याचा अवघ्या, तुह्मां न यश ये जों काळ आह्मी जिवों." बोले तैं ती — " जेविं वाटे, करावें, - जात्यें आतां काय होतें पहावें; भीती वाटे, काय होईल अंतीं; कैसे आलां सिंहिणीच्याच दंतीं !" १४० ५