पान:इंदिरा.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साचा:'''centerप्रस्तावना.'''  हें काव्य ख्रिस्तलोकनिवासी आंग्ल- राजकवि टेनिसन यांच्या प्रिन्सेस नामक काव्याची अनुकृति आहे, भाषांतर नव्हे. रघुनाथ पंडितानें केलेलें सुप्रसिद्ध नळोपाख्यान ही नैषध काव्याची याच प्रकारची अनुकृति आहे. प्रिन्सेस काव्यांतून साधतील तशीं, व योग्य वाटलीं तशीं, अनेक वाक्यें इंदिरा काव्यांत मराठी भाषेत पहिल्या आवृत्तींत पद्यरूपाने घातलीं होतीं; शिवाय माझेही कांहीं अल्प विचार समाविष्ट केले होते. रघुनाथ पंडिताचीही पद्धत अशीच दिसते. पहिली आवृत्ति दोन हजार प्रतींची होती; पैकीं बाराशें प्रती, पहिली आवृत्ति प्रसिद्ध होतांच, विकल्या. बाकीच्या प्रती ठाणे, पुणे येथील लहान मोठ्या शाळांतील मुलांमुलींस फुकट वाटल्या. पहिल्या आवृत्तींत भाषेचे, व्याकरणाचे, छंदांचे, छापण्याचे वगैरे जे अनेक दोष होते, ते काढून टाकण्याचा यत्न या आवृत्तीत विशेष केला आहे.

 पहिल्या आवृत्तींत जे दोष होते ते माझ्या खालीं दाखल केलेल्या तीन परम सन्माननीय मित्रांकडून कसे कळून आले, ते येथें आभारपूर्वक सांगतोंः-

(१) राजमान्य रा० विष्णु मोरेश्वर महाजनी एम्. ए. यांनी वेळोवेळी इंदिरेच्या पांच सर्गाचें परीक्षण करून, वन्हाडांतील वैदर्भ वर्तमानपत्रांत एकंदर नऊ लेख प्रसिद्ध केले.*
 * वैदर्भाचे अंक ता० ४ अक्टोबर १८८४ पासून, ता० ९ मे
१८८५ पर्यंत पहा.