पान:इंदिरा.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ लग्नाची मुळिं गोष्ट इष्ट इकडे ग्रामीं नसे आमुच्या, येथें सर्व कुमारिका गतधवा पाशांस संसारिंच्या त्यागोनी सुखद स्वतंत्रपण तें स्वच्छंद सेवीतसों, वार्त्ता काढूं नको विवाहविधिची, ती तुच्छ मानीतसों. १२८ वचन दिधलें आहे म्यां, हें तिचें व्रत साधिन; तन-मन तिच्या कार्या आर्या! दिलें तिज अर्पुन; बहु दृढ नरश्रेष्ठा निष्ठा असे तिचि कामिं या, बघुनि नगरी भासे कैसें न हें तुज कामिया ? १२९ दिंडी. अतःपर हो मी धनिण माझि नाहीं, नसे हातीं अधिकार मुळिंच कांहीं; जरी मारिल ती जिवें राजबाळी, पडे मरणें हो भाग तये काळीं. १३० सांगवेना; जरि कळे तिला वृत्त पुरुष आल्याचें, क्षोभुनी किं चित्त जिवें मारिल वा तुह्मां हांकुनीयां हद्दपार करिल मंदिरांतुनी या. १३१ मुखावाटे मम एक शब्द आला तुह्मांविषयीं कीं भडकतील ज्वाला; उगी राहें तों सर्व असे शोभा; वृत्त कळतां इंदिरा करिल क्षोभा. १३२ आर्या. का ना ठावें तुजला, नाहीं स्त्री ही, असेचि सिंहीण; कळतां कोण तुझी हें तुमचे जातील हो गमे प्राण. १३३