पान:इंदिरा.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७ श्लोक. आतां पुढें येउन चंद्रकेतू संपूर्ण सांगे तिजला स्वहेतू- "गे आवडे नित्य सुसत्यवाचा, ऐकें तरी या कल मानसाचा. १२२ देहीं या तूं देख गे राजपुत्रा ! ज्यालागीं त्या इंदिरे दिव्य पात्रा होतें जन्मापासुनी योजियेलें; येणें तीच्या भेटिलागींच केलें. १२३ तुझ्या देश-बंधूस येथें पहा गे!- जयाचे मनीं इंदिरा नित्य जागे; इथे ती वसे, वाटलें येथ यावें; न यावें तरी भेटि कोठेंचि जावें ?" १२४ वदे ती:- “स्वदेशास नेणेचि देहो; उरे देश-बंधुत्व मातें कुठें हो ? वसे ग्राम माझा, इथे सर्व कांहीं; सदा इंदिरे सेविती येथ राहीं. १२५ तिचा देश तो देश माझा असावा, तिचा धर्म तो धर्म म्यां आचरावा, तिचें कर्म जाणोन चित्तीं धरावें, तिला वंद्य मानोन येथें रहावें. १२६ संकल्पा करुनी अशा दृढ मनें अव्हेरिला ग्राम मीं; व्हाया साह्य सुकामिं राजतनये आयुष्य येथें क्रमीं; होत्यें जी अबला स्वयें बदलुनी गेल्यें असें मी पुरी, झाल्यें पूर्णपणे स्वतंत्र, नुमजे आतां जुनी वैखरी. १२७