पान:इंदिरा.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ पद. रागिणी भैरवी, , - ताल त्रिवट. योजुनि कायचि आलां ? | भ्रात्या ! ॥ ध्रु० ॥ धारण केलें स्त्री-वसनां कां ? धीट कसे अजि झालां ! । भ्रात्या० ॥ १ ॥ घेत असां शिरिं दुर्घट कार्या । नुमजे काय तुझांला ? । भ्रात्या० ॥ २ ॥ काय ह्मणावें, ऐशा तुमच्या सांगा पुरुषा- र्थाला ? | भ्रात्या० ॥ ३ ॥” ११७. साकी. बोले तयिं तो बंधु भगिनिला कोपित बहु होवोनी- “कैसें गेलें वात्सल्य तुझें विलया अजि पावोनी” ? झाला विस्मित तो । भगिनिस आवेशें वदतो. ११८ श्लोक. 66 'तर मग भगिनी तूं प्राण माझा ग घेई; तनुचि करुनि रक्षा ती पुरीं भूमि-ठाई, पुरशिल जिथ ती तैं लेख तूं गे लिही हा- 'भगिनिकरविं आला मृत्यु या बंधु-देहा' " . ११९ साकी. ऐकुनि तैं त्या शशिवदनानें वाद असा मित्राचा झटलें, - "वाणी कमलजेचि ही, ऐकुनि धालों साचा, बोले गोड किती! । उठले शब्द हिचे चित्तीं. १२० पाहिलि ऐशी साध्वी नयनीं झालों मी कृतकृत्य ! विचार हीचे गहन किती हे ! ज्ञान हिचें बहु स्तुत्य ! मृत्यू इथ येतां । देइन प्राण तया आतां." १२१