पान:इंदिरा.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिंडी. "नसे थट्टा ही, सत्य मीच बोलें, जरी आजवरी बोलुं तें न केलें, परी घडुनी येईल सर्व आतां, धैर्य आलें बळ आमुचिया हातां. ११२ राजतनयेच्या जाउं नको वाटे, तिच्या मार्गी रे असति बिकट कांटे; उगें माझ्यानें बसवणार नाहीं, वृत्त कळवाया तिजशिं जाउं पाहीं. ११३ श्लोक. का अग्निशीं कोण कधींहि खेळे ? का तैल पाण्यांत कदापि भेळे ? का शस्त्रधारेवरि तीक्ष्ण कोणी ? ठेवी बळें अंधपणें स्वपाणी ? ११४ का तांदुळांमाजि उडीद भेळे ? बाजू कड्याच्या कुणि काय लोळे ? वाटे तुह्मां ही अवघीच थट्टा; लावीतसां हो स्वकुळास बट्टा. ११५ भासे मातें करणि तुझि कीं व्यर्थ आलासि येथें, जा रे, जा तूं परतुनि गृहीं योग्य मार्गे किं जेथें शौर्या ज्ञाना सकलहि तुझ्या स्तुत्य हेतू मिळेल; येथें प्राणा मुकशिल फुका काय तेणें फळेल ? ११६