पान:इंदिरा.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ साकी. भरधांव जशी नौका तरतां जलधी-पृष्ठावरती, एकाएकी शिडें कोसळुनि, फडफड उडुनी, ती अस्ताव्यस्त डुले, । तैसें या घडिं तिज झालें. १०६ शब्द दाटला कंठीं तिचिया, नुमजे काय वदावें; नुरे भान; उद्भवली चिंता कां भावानें यावें, कवण मिषें | भाऊ येई स्त्रीवेषें ! १०७ लोक. “तूं काय येथें करितोसि बाळा ?" बोले स्वसा मारुनि हात भाळा; “हा वेष ! हे कोण ? कुठें निघाले ? कीं लांडगे मेष-समूहिं आले! १०८ हे माय-शक्ती, अबला- जगाला घाला विनाशी अजि केविं आला ! या कृत्रिमानें विलयास जाऊं"; भाऊ ह्मणे, "तेविं घडों न देऊं." १०९ "नाहीं देखियला" ह्मणालि भगिनी “द्वारावरी लेख का? 'येई स्त्री - जगतामधीं पुरुष जो, प्राणा मुके तो फुका; ' " बोले बंधु सुशांत तैं भगिनिला "का स्त्रीजनांहातुनी झाली आजवरी असे कृति अशी, गेलां जरी मातुनी? ११० बोलावें तुझिं हो, दटावुनि उगा, अंगीं मुळीं ना बळ, ऐशा भ्याड असां तुझी किं; 'अबला' हें नाम हो केवळ तुह्मां योग्य दिसे. " तदा भगिनिनें केलें तया उत्तर, आवेशे चढवोनियां भ्रुकुटिला, काढोनि उच्च स्वर- १११