पान:इंदिरा.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३ "युग्म" (चित्रयोग, मनमोहक गायन, नृत्य, नाटक, मृदंग-सुवादन, धातुशोध, तरुयोग, रसायण, | वस्तुधर्म-सुविवेचन, तक्षण, १०० | वास्तु, शिल्प, सुकला बहू दुज्या | आह्नि आजवरि जाणतों न ज्या, गूढ आजिवरि जें असे स्त्रियां, (निश्चयें शिकवुं तें इथे तयां. १०१ येई काळ जयीं स्त्रिया जिथ-तिथें होतील त्याही कवी, सृष्टीला सुख देतिल स्वमतिनें काव्यें रचोनी नवीं; सौंदर्या कथितील त्या जगतिंच्या, मांडोनियां गायन; ऐशा स्त्री-कविंचें अशा नगरिं या आह्मी करूं पालन. "१०२ दिंडी. पुरें होतां व्याख्यान, कमलजेनें खूण केली तिघां बहू नम्रतेनें; सर्व विद्यार्थी आपआपुलाल्या नित्यकार्याला जावया निघाल्या. १०३ तिघे गेले तिजपाशिं नारिवेषी, तयां बोले ती, "बुद्धि तुह्मां खाशी असे सुचली कीं एथ तुझी आलां तुच्छ मानूनी पुरुष-मोह-जाला". १०४ श्लोक. बोलोनि ऐसें निघतांचि जाया ती आपुल्या ओळखि बंधुराया; “हे बांधवा!”–“हे भगिनी!" असें तीं परस्परां बोलुन ओळखीती. १०५