पान:इंदिरा.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ दिंडी. आर्यभूमीच्या ठायिं पूर्वि झाले संत साधू ऋषि तयां वर्णियेलें; विशेष ज्या या आर्यदेशि झाल्या स्त्रिया श्रेष्ठा, त्या कथी श्रोतियांला. ९५ श्लोक. अशी पूर्वजांची स्थिती पूर्वकालीं वचें गोडशा श्रोतियां सांगियेली; स्त्रिया सर्व साद्यंत तें आयकीती; किती वागती वर्गि त्या योग्य रीती ! ९६ नाहीं कोणी काढिला शब्द तोंडीं, ऐशी स्त्रीच्या शांतता पूर्ण हाडीं, व्याख्यानाच्या शेवटीं हें भविष्य साध्वी बोले, कीं तिला सर्व दृश्य – ९७ “जैं तैं स्वामी खास होतील दोनं, जेथें तेथें दोन जाती मिळोन एका मानें एकवृत्ती सुचित्तें दोन्ही एका चालवीतील सत्ते. ९८ ज्ञानाचीया वृद्धिलागीं हि तेवीं दोन्ही एका कारणीं सुस्वभावीं लागोनी उत्कर्ष तीं पावतील, सत्कार्थी तैं जीवना लावितील. ९९ १ स्त्रिया आणि पुरुष; एकटा पुरुषच आज स्वामी आहे; स्त्रिया मुलाम किंवा दासी, असा अर्थ.