पान:इंदिरा.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१ आर्या. कथि मग गुरुमाता ती प्राणी जन्मा कुण्या रिती आले, उद्भिजां जीवन तें प्राप्त कसें श्रेणिश्रेणिनें झालें. ८९ कृमि-कीटकादि प्राणी, स्वेदज अंडज दुजे अनेक तसे, जारज सस्तन, सांगे अंतीं सृष्टींत येति तेचि कसे. ९० दिंडी. कसा मानव तो क्षुद्र अणू-ठायीं बनुन, जन्माला दिव्य देह येई; कसा घटुनी तो रोमरंध्रपिंड वंश पितरांचा वाढवी उदंड. ९१ श्लोक. सिंहावलोकन करी मग ती सुवाचा योजून, सांगत तदा इतिहास साचा, देशीं विदेशिं कशि मानवजातिमाजी होती स्थिती कवण ती कथि, होय आजी. ९२ दिंडी. कुण्या रंगें माखिले, कशा वेषीं असति पूर्वज ते कोण, कुण्या देशीं, कुण्या हिंडुनि वनिं झोंप सुखें घेती, काय खाती पिति कुठें कशा रीती. ९३ श्लोक. कंद-मूळ करितात किं सेवन, पाचितान्न -रस-युक्त किं भोजन, वल्कलें करिति ते परिधान तीं, व्याघ्र - ऋक्ष - मृग - चर्म किं नेसती. ९४