पान:इंदिरा.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साचा:Center'''विद्वज्जनप्रार्थना.'''

आर्या.

रंग मयूरसम नसे, तरि काकें पंख काय टाकावे !
गान मयूरसम न ये, अल्प रितीं कां तरी न म्यां गावें ? १
बाळ हुशार नसे, बहु परि बोलां बोबड्यां न तें सोडी;
विद्वज्जनहो, माझ्या अल्पमतीची तशीच घ्या गोडी. २

जरि धांवाया ये ना, तरि का भ्यावें मुळींच चालाया ?

जैसें तैसें रचितों, वाचा साद्यंत, आर्य, काव्या या. ३
'भक्तिसुधा' ती रचिली ईश-परायण - मनोगतीनें मीं,

कथिल्या 'विलापलहरी' जातां भार्या अखंड - सुख-धामीं; ४

आतां गातों, कैसें स्त्रीपुरुषांचें परस्परांलागीं
साह्य असोनि, परस्पर घ्यावें ओझें स्वयें शिरोभागीं. ५

श्लोक.

कान्होबा, रणछोडदास - सुत मीं कीर्तीकरांच्या

कुळीं

जन्मा येउनि, सार्थक स्वतनुचें केलें न वाटे मुळीं;

आहे एकचि आस या मनिं अशी- काव्यें रचोनी स्वयें, 


द्यावीं म्यां विनयें सदा कविजनां अर्पोनि हस्तद्वयें. ६
 १ "मोरोपंत कविवर्य यांच्या सारख्या आर्या रचितां येत नाहींत, ह्म-
णून - " असा अर्थ.