पान:इंदिरा.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९ स्त्रियांनीं रांधावें; भरुनि घट ते स्वच्छ उदकें कटीं खांदीं न्यावे श्रमत, जरि तो प्राणहि थके; दलोनी, कांडोनी, निसुनि, टिपुनी, धीर धरुनी खपावें, ऐसेंही निशिदिनिं जिवा त्रास करुनी. ७८ पतीलागीं कांहीं स्वकृत रुचलेंना कधिं जरी, शिव्या लत्ता घ्याव्या करुनि इतुकें त्याहि उपरी ! मुलांचे काढावे श्रमुनि दमुनी कष्ट सकळ, कुमागें तीं जातां बहुत तिज लागे हळहळ !" ७९ साकी. अशी गृहदशा वर्णुनि, तीणें विषय दुजा वर्णाया आरंभीलें; असे गहन, परि ऐकवि तो निज शिष्यां; स्त्रियां सुगम झाला, । जो दुर्गम बहु पुरुषांला. ८० श्लोक. सांगे पुढें विश्व कसें उदेलें, निर्माण कीं दैवगती जहालें, कीं सर्व हा मायिकसा पसारा होवोनि गेला निमिषांत सारा. ८१. असे ब्रह्म आधीं किं झालें स्वयंभू; स्वराकाश वायू तथा तेज वार्भू जहालीं स्वतःसिद्ध कालक्रमानें, घडीलीं कि एक्या प्रसंगी विधीनें. ८२ आर्या. मग ती खगोलवर्णन सुश्राव्य करी बहूत चातुयें, जें ना खगोलवेत्त्या ज्ञात्या पुरुषां कदापि करितां ये ८३