पान:इंदिरा.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ शरीरा सौंदर्या वपनविधि विच्छिन्न करितो, पती जातां पत्नी-भव-सुख सदा सर्व हरितो; भ्रताराचा केशांप्रति कवण संबंध न कळे, किती क्रूरा दृष्टी ! पुरुषमन तें ना हळहळे. ७२ जरी एक भार्या मरे त्या नराची, तिचे दीसे झाले न, तों अन्य याची; स्मशानीं दुजेची करी चौकशी ती, जिथे एक पत्नीचिता पेट घेती ! ७३ असे काय ऐशा नरां पोटिं माया ? तुळावें यमाशीं अशा कीं नरां या; वराया स्वयें जो दुजी नार पाहे, न जाणे स्त्रियां केविं वैधव्य साहे. ७४ 'कुलीन' स्वयें आपणांतें कितीक जगीं बोलवीती; स्त्रियांतें अनेक वरोनी रहाती ! मनाचे विशाल ! सहस्रा स्त्रिया तहृदीं मावतील ! ७५ कुलीनत्व का हें ? पुरें हीण साचें; वधूचें असे पाप, तैसें वराचें. जसा वाहती ते शिरी केशभार, स्त्रिया मावती तेविं गेहीं अपार ! ७६ बिचाया गुलामापरी दीनवाण्या गृहाभीतरीं सेविती अन्नपाण्या; जशीं लोळती श्वान-मार्जार गेहीं, बसावें तशा रीतिनें त्या स्त्रियांहीं. ७७ १ तेरा दिवस.