पान:इंदिरा.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ - “रूप हो किती ! " बोलला शैशी- "रम्य हें दिसे; शोभत्ये कशी ! " "हो उगा !" वदे राजपुत्र त्या, “पाहिजे हंसें कां अजाणत्या ?" ६६ केंवि आयका कमलजा गुरू पाठ नित्यचा मग करी सुरू- "ज्ञानभुक्त ज्या मज तुह्मी दिसां, मुक्ति जों मिळे तंव इथे वसा. ६७ जगतिं हो पहा का गती असे, बळ जयीं तयीं श्रेष्ठता वसे; सबळ व्हा, तरी ये यश श्रमा, मनिं अशा धरा सृष्टिच्या क्रमा. ६८ देखा स्त्रियांना जन वागवीती नाना प्रदेशीं अजि कोण रीती, ते तुर्क, तैसे चिनि ते, दुराणी, अफगाण, सिंधी, बलुची, इराणी. ६९ कैसा स्वयें बांधुनियां जनाना कोंडी मुसल्मान वधूंस नाना; देखे तयां नित्य कुशाग्रदृष्टी, संदेह पोटीं, मुखिं गोड गोष्टी. ७० कशा बाला प्रौढा विगतधव होतांचि युवती अह्मां हिंदू लोकीं अखिल अपुलें आयु मुकती, सती बोलोनी स्त्रीदहन करिती, निष्ठुर किती ! स्त्रिया सोसूनी ही भयकर दशा "हाय" वदती. ७१ १ शशिवदन. ४