पान:इंदिरा.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. वर्गी आले; देखिली त्यांहिं कांता शिष्यां शोभे दिव्य जी सेव्य माता, राहे ऊभी घेउनी ग्रंथ हातीं, आनंदोर्मी दावुनी नेत्रपातीं. ६० बाजू एका पाळण्यामाजि बाल नामें होतें मंजुळा; हालचाल नाहीं कांहीं; निद्रित स्वस्थ होतें, वाटे विवीं अन्य नोहे सभोतें. ६१ अहा ! बालकांनींच निद्रासुखाचा महानंद घ्यावा; न त्यांतें भवाचा वृथा हा पसारा कदा दुःख देई; सदा मानसीं बाल संतोषि राही. ६२ वर्गी होत्या बैसल्या जागजागीं विद्यार्थी तैं ज्ञान-संप्राप्तिलागीं; कोणी मागें, कोणि त्या अग्रभागीं; तेथें तेही बैसले कंपितांगी. ६३ कमलजा तिथें दृष्टि फेंकुनी नवशिक्यांप्रती पाहि रोखुनी; कमलजेस तो बंधु पाहुनी बहुत हर्षला आपुल्या मनीं. ६४ विनय हो किती डोळियामधीं; किं शोभते मूर्तिमंत धी! “कमलजा ! स्वसा !” काढि तो जरी ध्वनि, हळू न तों योग्य तैं तरी. ६५