पान:इंदिरा.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ श्लोक. गतानुगतिका पथा त्यजुनि, वास येथें करा; विभूति निज जातिच्या सतत रक्षणीं तत्परा सदा बघित या, असा; अति महानुभावाकृती ! पवाल अनुभूति जोंवरि, बघाल त्यां त्यां प्रती. ५४ उदात्त मन होउं द्या, सकळ हेतु ते आमुचे विमुक्तिपर आदरा; हित करोन घ्या तूमचें; स्त्रियां अति अलभ्य जो दिसत आज विद्यांबुधी करीं सुगम त्या, जरी नर ह्मणे स्त्रिया मंदधी. ५५ स्त्रियांना पराधीनसें वागवीलें असे त्या नरांनीं, बहू दीस झाले; अशा या पराधीनते अंत येई करा तोंवरी ज्ञानपाना, सुनारी ! ५६ अज्ञान जन्या तुमच्या प्रमादां, धीमत्सरा, तेविं जनापवादां, निंदाप्रवृत्तीप्रति अंत येई, ज्ञानामृता प्या, इथ तों सुनारी ! ५७ आर्या. जीवन निष्कामी तें मन असल्याला उदारता शून्य जगिं राहणें नको तें, मरणें त्याहून वाटतें धन्य." ५८ दिंडी. असें बोलुन त्यां दावि अंगुलीनें जिथें होता मांडिला कमलजेनें वर्ग अपुला; तिथ जा तिघांस सांगे, दिली दासी, ते जाति तिच्या संगें. ५९ F