पान:इंदिरा.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ श्लोक. कृष्णाकुमारी किति सौम्यवृत्ति ! आज्ञा पित्याची समुळीं सनीती पाळोनि दावी पुरुषां, सुबाळी स्त्री मृत्युला भीत कुण्या न काळीं. सुराज्ञी अहिल्या स्मरा इंदुरींची, तळीं खोदवी गांविंचीं तीं दुरीचीं कशीं; अन्नछत्रा स्वधर्मानुसार उभारोनि, दीनां सुखा दे अपार. दिंडी. श्रेष्ठ भक्तिर्णिमधिं देवि मिराबाई होइ; कौतुक किति करूं सांगुं काई ! रचुनि काव्यें ती गाइ मधुर वाणी ! गणा स्त्रीलोकीं तिला धन्य प्राणी. श्लोक. अशा या स्त्रिया थोर साध्वी प्रतापी पुराणीं कवी-संत-योगी-कलापीं सुखें वर्णिती, त्यां इथे मूर्त देखा; तशा व्हा, स्वनामा चिरंजीव राखा. ५२ साकी. ४९ ५० तुमच्या उत्तेजनार्थ पुतळे त्यांचे जागोजागीं उभारले, फलप्राप्ती त्याची होवो तुझांलागीं, न्यहाळा हे पुतळे, । अपुले सुखवा हो डोळे. ५३