पान:इंदिरा.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ प्रविकळ रथचक्रा संगरीं कैकयीनें स्वकर परम युक्ती घालुनीयां घिरानें, रणभुमिवर वेगें चालवीलें रथाला, दशरथ पतिराया, धन्य ! नेलें यशाला. ४३ देखा दक्ष कशी स्वधर्मअवनीं ती दिव्य तारामती, दुःखें पीडित जो फिरे पति गुणी त्याच्या सर्वे ती सती उल्लंघी गिरिकंदरां, मुळिं गणी ना ताप ना आपदा, प्रेमें दुःख न मानुनी, निजपती सेवीत भावें सदा. ४४ लक्ष्मी सती केविं बघा उदार ! वाहे जगाचा शिरिं कारभार, बोलोत हो चंचल ती असे कीं, चांचल्ययोगें सुख होइ लोकीं. ४५ द्वारीं पहा शोभत शारदा ती, सान्या जगा ज्ञानसुबुद्धि देती, विद्याप्रसाराप्रति कारणीं जी. ज्ञानामृता ती जगतास पाजी. ४६ साक्या. स्मरणीं आणा मुक्ताबाई होती कैशि विरक्त, अविवाहित राहुनियां जन्मीं, झाली निश्चळ प्रभुभक्त. अति प्रेमळ कवितें । गाउनि तोषविले श्रोते. ४७ नाम्याची सद्भक्तिपरायण पवित्र प्रेमळ दासी जनाबाई ती दुजी आठवा, वर्त्ते जगतीं कैसी? ह्मणवी "वेडिपिशी” । “जना" ती नव्हती परि तैशी. ४८