पान:इंदिरा.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ निंद्य राक्षसि पूतना दुराचारी कृष्ण मारूं ने विषा दुग्धधारीं, रामकाळींची शूर्पनखा दंशी, अशां माना तुझि तुच्छ सर्व अंशीं. ३७ श्लोक. रामाप्रती ती शबरी स्वभक्तिनें जेवीं स्तवी, तेविं तुझी सुरीतिनें स्त्री-लोक-उत्कर्ष गणूनि राघव • कार्यों झटा; होइल प्राप्त वैभव. ३८ जशी काळिका दुष्ट सासुराला वधोनी करी तुष्ट साज्या जगाला, वधा तेंवि स्त्रीदास्य-ौसासुरा, तो तुह्मां बालकांचे परी वागवीतो. ३९ साक्या. चिलयामाता देखा कैशी होती निष्ठावंत, दिधला आपुला पुत्र पोटिंचा, तोषविला तैं संत; दुःखें मन दाटे, । परि ना संतभक्ति आटे. ४० दमयंती नळभूपतिजाया पतिविरहानें कैशी व्याकुळ झाली, परी वरी ना कोण्या अन्य नराशीं, ऐशा निष्ठेच्या । सखिनो व्हा तुझी साच्या ४१ श्लोक. हिमनगतनयेनें भिल्लिणीच्या स्वरूपें वनिं निजपतिसत्त्वा देखियेलें प्रतापें; दृढ बळ तयिं दावी आपुल्या निग्रहाचें, सतत मनिं असों द्या धैर्य हें पार्वतीचें. ४२