पान:इंदिरा.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१ असों द्या क्रिया सर्व कालानुसारी, पहा वर्त्तती केविं येथें सुनारी, असा जैं नव्या, सिद्ध व्हा शुद्ध व्हाया लतांचे परी कोंवळ्या हो वळाया. ३१ नका हो स्मरूं गोकुळींच्या व्रताला, नसे कृष्ण येथें, न ती कृष्णलीला, सदा जानकीसत्त्व जीवीं धरा हो, तिचें मानसीं योग्य धारिष्ट राहो. ३२ बळें लोमें सीते दशमुख जयीं दुःसह रिती करी कष्टी तीतें, तरि निज न सोडी व्रत सती, तशा तुझी व्हा हो; सकळ तुमची वृत्तिहि तशी न झाल्या, होई हो कधिंहि तुमची उन्नति कशी ? ३३ सती सीता साध्वी सकळ जगता शिक्षक सदा, धरा निष्ठा ध्यानीं विमल तिचिया घ्या तुह्नि पदां, सहस्रा तोंडांची प्रबल नरदासत्व असुरी स्वहस्तें हाणाया, सकल युवती व्हा, तुझि अरी. ३४ दिंडी. रासरंगें गोपींस वेणुनादें पडलि भूल, तशा भुलूं नका नादें; रुक्मिणी ती जशि कृष्णनिष्ठ होती, तशी निष्ठा निजकार्यि तुमचि हो ती. ३५ पंच पतिला ज्या एकनिष्ठ पत्नी सती द्रौपदिनें सेविलें सुयनीं, तिची निष्ठा तुझि मानसीं धरा हो, कार्य तुमचें या चित्त तेविं राहो. ३६