पान:इंदिरा.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० काळ येइल निश्चयें तुह्मां सांगें, मुक्त होऊं एकल्या ज्ञानमार्गे २५ श्लोक. सम-विषम गृहीं तें पाहिजे हो कशाला ? सम-सम नरनारी कां न तीं आपणाला समजुनि मनिं देती साह्य तें एकमेकां ? कधिं मग गृहिं तेणें नाहिं येणार धोका." २६ हें वाक्य येतां विषतुल्य कानीं खालीं मुखें केलिं सवें तिघांनीं; वाग्बाण गेले तळि अंतराच्या स्त्रीमुक्तिहंत्या नटल्या नरांच्या. २७ एक नार दिसण्यांत सुमावली नम्रपाद पुढती सरसावली; वाचुनी कथितसे मधुरा रिती स्पष्ट कांचनपुरीनियमास ती. २८ दिंडी. "तीन वर्षे गृहिं नाहिं जावयाचें; तीन वर्षे नगरींत राहयाचें; तीन वर्षे संसर्ग मुळिं नरांशीं, नये ठेऊं व्यवहारही घराशीं." २९ श्लोक. नियम अणिक ऐसे अन्य नानाप्रकारी परिसुनि पटिं नांवें घालती वेषधारी, वदलि मग तयां ती “धीट व्हा, नीट वागा, स्वगृहिं करितसां जे सर्व आचार त्यागा. ३०