पान:इंदिरा.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



दुसऱ्या आवृत्तीचें

साचा:Center'''पुस्तकार्पण.'''

{{centerश्रीमती विदुषी रमाबाई रानडे}

यांच्या चरणीं इंदिराकाव्याची ही दुसरी आवृत्ति
अर्पण केली असे.
श्लोक. (शिखरिणी).

रमा!

स्त्रीवर्गी ज्या प्रमुख विदुषी साच दिसतां, स्त्रियांच्या उत्कर्षा सतत बहु सप्रेम झटतां; असोनी ज्ञानी हो ! सुविनयभरें पूर्ण सजलां ! सुशोभा देताहां अगणित, अहो आर्य-महिलां; स्त्रियांच्या दैन्यातें हरण करण्या तत्पर असां; स्त्रियांमाजी आजी गुणमणि मला दिव्यचि दिसां; "स्त्रियां जैशा वंद्या" सुजन वदती "तेविं हि नरां;" तुह्मां पायीं अर्पी कवन मम हैं जोडुनि करां ! २
साकी.
गायकवाडी साजिरायां पहिली अर्पीयेली, चरणीं तुमच्या दुजि आवृत्ती ही अजि सादर केली, मान्य करा तिजला, । द्या हो उत्तेजन मजला.

कान्होबा.