पान:इंदिरा.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्रीनगरप्रवेश - नामक सर्ग दुसरा. ३ B:6:45 श्लोक. 6 उगवतां रवी द्वारपाळिका स्वकरिं आणुनी अंबरादिकां, नविन पातळें स्वच्छ शुभ्र तीं हिरवि चोळि दे एककाप्रती १ देउनी तयां बोलली – "चला, इंदिरेचिया जाउं भेटिला; सोडुनी जुनें वस्त्र, येथलें पाहिजे तुह्मां नित्य नेसलें." २. लेवुनी तिघे श्वेत अंबरा, स्त्रीजनांसवें बुद्धिसंगरा चालले तदा मिष्ट भाषणे इंदिरेचिया भेटिकारणें. ३ इंदिरा नृपसुता-अभिधान, बुद्धिचें न जिचिया कधिं मान होइ, ती निवळ सर्व पसारा चालवी स्वमतिनें कुलतारा. ४ शुभ्र से चिरे संगमर्वरी आजुबाजुला मंडपांतरीं स्वच्छ घोटले पूर्ण रेखिले विस्मयें बहू त्यांहिं देखिले. ५ स्त्रीजनें स्वयें बुद्धिच्या बलें मंडपास त्या हातिं बांधिलें;