पान:इंदिरा.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ चालतां तिघे इंदिरेकडे, पाहती क्रमा, नित्य जो घडे. ६ उदयं त्या दयिता, नवयौवना, विगलिता, प्रवयस्क कुलांगना, उठुनियां करिती प्रभुवंदना, स्मरति भावभरें जगजीवना. ७ परि बघा किति माद तयां मनीं, पुढिल मंजुळ ईश्वरगायनीं पुरुषवाचक नाम मुळीं नसे, प्रभु किं नारिरुपीं जगतीं वसे. ८ भुपाळी. राग बिभास – ताल एका. ( घनश्याम सुंदरा – या चालीवर. ) विश्वजननि, जगदंबे, धात्री ! तुज अवघ्या कामिनी भगिनीमंडळ विनवुं दयाळे ! यश दे आह्मां जनीं ॥ ध्रु० ॥ स्त्रीजातीला अबला ह्मणुनी, कोणि न त्यांतें गणी; पुरुषगणांच्या दास्यांतुनि गे, सोडविं आह्मां झणीं; गर्ने लोभें मदें मत्सरें, पुरुष बहुत अवगुणी, सत्ता करिती आह्मांवरि ते, ह्मणविति अमुचे धणी; सावकार ते होउनि बसले, असतां अमुचे रिणी; नित्य गृहीं काबाड वाहवा, ना तरि दुःखें दुर्णी. ॥ चाल ॥ या भवार्णवीं हें केलें कैसे जिणें? परतंत्र ठेविलें आह्मां, स्वातंत्र्यसुखाविणें, कलुषित होती मनें, व्यर्थ होति भांडणें; ॥ चाल || नरनारींच्या भीतरीं तयिं नसे स्वस्थता मनीं ॥ १ ॥ विश्वजननि० ९