पान:इंदिरा.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३ 'कमलजा शशिकला दोघि या, " बोले कोंडी त्यांला, “ शिक्षण देती; असे कमलजा प्रियतर सर्वत्रांला; आहे मधुरमुखी, । करिते शिष्यांलागि सुखी." १११ श्लोक. आपसांत मग ते ठरवीती- - “आवडे कमलजा, बहु रीतीं गेलिया तिजकडे नच भीती, ज्ञानपान करूं या तिजहातीं. " ११२ पत्र राजतनये मग लीहिती- " चंद्रिका, रदनिका, कमलावती, उत्तरेकडुनि येवुं तिघी स्त्रिया, मागतों तुमचिया नगरींत घ्या. ११३ दिंडी. असों आम्ही नृपमंदिरिंच्या दासी; इथे आलों हो दिव्यपदापाशीं मनीं ज्ञानाची धरुनियां अपेक्षा; नगरिं आम्हां घ्या, करुं नका उपेक्षा. ११४ श्लोक. परिसुनि गृहिं नांवा राजकन्येचिया या रुचलि सुकृति, तेणें पातलों मुक्त व्हाया; विनवुं कमलजेच्या शिक्षणीं राहुनीयां, सुफलित करूं सारा जन्म, जो जाय वायां. ” ११५ पत्र बंद करुनी, वरि मोहरे सार्थ रेखिति बघा किति साजरे; एक बाण धरुनी मदनें करीं, चार सोडियले शर अंबरीं. ११६