पान:इंदिरा.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ कोंडी करी प्रश्न " कुठेंचि जातां ? कोठून हो योजुन काम येतां ? कीं राहण्याला इकडेचि आलां ? की आपुल्या जाल पुन्हा घराला ? १०६ सांगा, तसे मी चरवीन घोडे बांधोनि पागेमधिं त्यांस थोडें, देईन पाणी, थकले बहू हे; हा बाष्प, हा घर्म अपार वाहे'." १०७ दिंडी. करी रायाचा तनय उत्तराला- “मायबापां त्यागोनियां घराला, नाम एकोनी राजकन्यकेचें वतन सोडियलें जन्मल्या दिसांचें. १०८ श्लोक. आहे दूरी आमची जन्मभूमी; येथें आलों राहण्या ज्ञानधामीं; विद्यासौख्या सेवुं जावूनि शाळे, सांगा ऐसें जावुनी राजबाळे." १०९ साक्या. कोंडीपाशीं मग चवकशि ते करिती-"कोण ? कशी ती शिक्षण देई अपुल्या शिष्यां ? वागवि कैसे रीतीं ?” वदती कथ बाई । कायस्वभावी गुरुमाई." ११० 66 १ घोडे थकले म्हणजे त्यांच्या आंगांतून वाफ येत्ये, फेंस येतो, घाम येतो.