पान:इंदिरा.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ पद. राग खमाज-ताल एका. ( लचक लचक चलत मोहन – या चालीवर. ) सजुनि सुहृदसहित कुंवर आला | नगराला; बघुनि मुकुलभर विकसित तरुवरिं मनिं धाला; तिथें ध्रु० विटपिं विटपिं कोकिल उडति, काढिती मधु स्वराला सुरभि ऋतुची रुचिर सरणी । बघुनि रमुनि जाइ, तिथें सजुनि सुहृद ०. १ आभरणभर रम्य जलधर । नूतन रविप्रकाशें सुरंगभरित करिति नृत्य, । दिसत सकळ रम्य, तिथें सजुनि०. २ डुलति रान - मोर-कीर, करिति कपि भुःकार तिथें शोधित सुरस भ्रमर फिरति । शोभत मही विलासें; तिथें सजुनि० ३.१०३ श्लोक. स्त्रीवस्त्रभारें श्रम फार झाले, ऐसे तिघे देवडिपाशिं आले; घाटीण कोंडी तिथ घोडियांला येई धराया बघुनी तयांला. १०४ कोंडी भली बाइल दांडगी ती धिप्पाड बोले, परि नम्र रीतीं; ऐशी असे कांचनपूरवृत्ती कीं नम्रता नित्य असावि चित्तीं. १०५