पान:इंदिरा.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० कां पौरुषा आजचि घालवावें ? स्त्रीजातिहस्ती अधिकार द्यावे ? ९६ चला, उठा, या, सजवीं तुह्मांतें करोनि वेणी–फणि हो स्वहस्तें; नसोत चोळ्या, नहि उंच साड्या, त्या स्वच्छ देईन, असोत जाड्या. ९७ श्रमें रात्र जागोन पोशाक केले, तिघे साडिचोळी स्वयें शुद्ध ल्याले, करीं कांकणें, कुंकुं लावोनि भाळीं, उषःकाळ होतां निघाले सुवेळीं. ९८ विनोदें महा पाटलें रामराम करोनी ह्मणाला “तडी न्या सुकाम ! हरा गर्व त्या सर्व यत्नें स्त्रियेचा; नरांमाजि वानील हो धन्य वाचा !" ९९ रवि मृदु किरणांनीं लोपवी जैं तमाला, सजवि रुचिर रंगें कांचनी कांचनाला, समयिं तयिं बहू त्या अंबरीं शीतदायी पवन सुटुनि खेळे; इंद्रियां तोष होई. १०० साक्या. ऐशा सुंदर उषःसमयीं स्त्रीजनस्वातंत्र्यारी आले, थकले, दमले, श्रमले कांचनपुरिच्या द्वारीं द्वारावरि दिठ्ठला । त्यांहीं ब्रह्मकुमरि-पुतळा. १०१ सरस्वती जणुं या ज्ञानालायें रात्रंदिन ती ठेली, करीत रक्षण ज्ञानसिंधुचें, प्रेक्षित आलीं-गेलीं. शोभे बहु पुतळा । रविच्या किरणांनी सजला. १०२