पान:इंदिरा.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साकी ऐसें बोलत त्रिकूट कांचन नगरी संनिध पावे, विचार करितें कवण्या रीतीं नगरीमाजि शिरावें; ह्मणतें साह्य हवें, । कुणाचें न कळे मागावें. ८० श्लोक. बहुत नगरि शोभे रम्य तीरीं नदीच्या, झुळ झुळ झुळ वाहे नीर मध्यें जियेच्या; मृदु जलरव देई तोष कर्णेद्रियातें, सुखकर दिसतो तो देश सारा सभोतें. ८१ ग्रामापाशीं बघुनि त्रिकुटें शांतसें एक खेडें, विश्रांतीला तिथ उभविले आपुले भ्रांत घोडे; गेले तीन्ही बहुत थकुनी दिव्य ते वीर साचे, उल्हासानें उतरति तिघे तैं गृहीं पाटलाचे. ८२ सामोरा तो नम्र पाटील आला; हास्यें बोलें मिष्ट त्या व्याकुळांला खायाप्याया अन्नपाणी स्वहस्तें देवोनीयां तोषवी पूर्ण हेतें. ८३ पाटील होता नकल्या स्वभावें, ऐकोनि कीं बोल जनें रमावें; विद्या नसे त्यास मुळींच कांहीं, संतोषवी तो अपुल्या गुणांहीं. ८४ भोजनोत्तर तिघे मग तांबुला सेवुनी निघति घेउनि पाटला;