पान:इंदिरा.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१६
वाटेंत जातां वदती स्वमित्रा हिर्मूसल्या कोपित राजपुत्रा. ७५

साचा:Center'''

( मग चलत का न कर अटकी - या चालीवर. )
"कशा घोर छंद हा धरिशी; । काय मिळेना इतर
स्थळी वधू, । श्रम अपार निकरें करिशी. ॥ ध्रु० ॥ 

रूप असें का लागुन गेलें; । श्रम अपार निकरें० ॥ १ ॥

राजगृहीं अशि वाण किं पडली, । श्रम अपार० ॥ २ ॥

कुठवर खुळिच्या नादी पडण्या । श्रम अपार० ॥ ३ ॥

जिथ जाशिल तिथ चलूं, परि वाटे । श्रम अपार
फुका करिशी ॥ ४ ॥ कशा घोर छंद हा धरिशी. ७६
श्लोक.
गंगोद्भवापासुन सेतुबंध-
रामेश्वरातें फिरण्यास सिद्ध
आहों; परी तूं श्रम हे कशाला घे

शी ? फुका घालविशी वयाला.” ७७
बोले ऐका उत्तरा चंद्रकेतु-
"बोलाचा या जाणतों सर्व हेतुः
केली आहे मी परी हो प्रतिज्ञा,

मोडीतां ती हास्य होईल सुज्ञां. ७८ 

जाणां ना का क्षत्रियांचें जिणें तें बोले तैं ना चालल्या व्यर्थ जातें ?

यासाठीं हो जाउनी स्त्रीपुराला
मित्रांनो मी पूरवीतों पणाला.” ७९