पान:इंदिरा.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राजपुत्र कथि त्या घडल्यापरी केविं येइ तिथ शोधित नोवरी. ८५. काय पाटिल तया परिसा वदे - "गाढ ती नृपसुता भरली मदें; पूर्ण मी तिज अहो ! वळखीतसें; स्वैर, थोर अभिमानि मला दिसे. ८६. सुता माझी जाया नृपकुमरिला सेविति सदा; कधीं त्यांचा झाला तिजकरिं असन्मान न कदा; नव्या येती बाला दुरुनि जयिं शाळेत शिरण्या, ग्रहीं या आधीं त्या उतरति श्रमांलागि हरण्या. ८७ तयांसंगतीं माझि भार्या, सुता ती क्रमानुक्रमें नित्य नेमेंचि जाती; बहू सांगती गोष्टि रूपागुणाच्या सुतेच्या श्रमाच्या, भ्रमाच्या क्रमाच्या. ८८ दिंडी. विलक्षण ही किति असे राजकन्या, नरा मांजरिच्या कुतरिच्या अधन्या राहुं देईना नगरिं आपुल्या ती ! तुह्मां ठाव मिळे तेथ कवण रीती ? ८९ श्लोक. तोटक छंदे. 'अबलामय हें जग जाहलिया नर सोडुन जातिल ते दुनिया - & १ ही पाटलाची शुद्ध थट्टा, हे पुढील पद्य १०३ इत्यादि रचनेवरून दिसून येईलच. २ हे लोक तालसुरावर गातां येतात (पंजाबी ठुबरी, राग केसुरी, ताल त्रिवट.)