पान:इंदिरा.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१५
श्लोक.
बकुळिचें फुल तें सुकलें जरी,
मधुरता तयिंची उरते परी;
मुल कुलीन तसें चुकलें तरी, 
स्वसुकुलांकुर राहति अंतरीं. ७०
आज्ञापत्र लिहून देई तुज घे, जाई सुतेच्या पुरी;

होई साध्य तुला जरी हि तनया, सौख्यें तरी तूं वरी;
वाटे ती मजला असाध्य अबला, स्वच्छंद, हट्टी असे;

केले यत्न किती; मिळे अजि तुला, आशा मला ही नसे. " ७१


परिसुनि नृपयाची उक्ति ऐशी अभद्र,

बहु नृपसुत कोपें क्षोभला, जेविं रुद्र;
सकल नगरिमाजी धुंडुनी अश्व तीन,

त्वरित नृपकुमारें मेळवीले कुलीन. ७२
अश्वांपाठीं घालुनी खोगिरांला

योजीयेला अश्व तैं एककाला;
थंड्या पारीं रात्र होतां निघाले,

सांगूं का त्यां किती क्लेश झाले ! ७३


प्रिय सहचर मार्गी चालतां त्या कुमारा

विगलित-नृपपुत्रा देति धैर्ये इषारा, रमवित निज मित्रा कांचनासन्न आले,

ति मनिं करावें काय त्या राजबाले. ७४
ज्यां स्वार्थ नाहीं, पर ना, न आप, ते मित्र दोघे शमवीत ताप,