पान:इंदिरा.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही



१४
होऊं नये स्वगृहिं त्या कलहास मूळ,
कन्येप्रती दिलि म्यां नगरी समूळ. ६४ 

वसे तेथें शाळा; सकळ तयिं नारी जमुनियां
सुतेच्या आज्ञेनें, गणुनि तिजलागीं बहु प्रिया,
सुविद्याभांडारीं विविध विषय-ज्ञान वरिती,
हरावें दास्या तैं स्वमनिं अभिमानासि धरिती. ६५

स्वबंधू स्वप्राणासम जरि सुते सर्वहि रिती, 

तरी स्त्रीग्रामीं त्यां तिळभरहि देई स्थळ न ती;

मिळे तेथें कैंचा इतर पुरुषां ठाव नगरीं;
स्त्रियांवी बाळा कवण इतरीं संग न करी. ६६
श्लोक (तोटक छंद).
वरण्या तुज देइन मी तनया,

गुंतलों वचना,मनिं जाचित या;
परि काय करूं ? मजला न कळे,
कशि वृत्ति विवाहिं मुलीचि वळे. ६७
तुजला वरिल्या सुखि होइल ती;

गृहिणी नसल्या अबले न गती;

तरि सत्वर जा! वसते जिथ ती,

तिजला हरिं तूं सुचल्या सुरितीं. ६८
साकी.
तुझ्या पित्याच्या राज्यशिवारीं

वसविलि कांचनपूरी, स्त्रीजनवैभव वाढविण्याला झाली ती नरवैरी;

शोभे हें न तिला । हर ! जा ! मुक्तमार्ग तुजला. ६९