पान:इंदिरा.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१३
अति मन कंवळें तैं नाशिलें कन्यकेचें,
पढविति जगिं या कीं धिक् जिणें त्या स्त्रियांचें . ५८
मुलिस जननीतुल्या झाल्या प्रिया गतभर्तृका;
दवडिलि न वा त्यांहीं संधी सुता शिकतां फुका;
वदति वनिता - लोक ध्वांतीं अशेषहि लोपला;
परिसुनि सदा ऐशी वाणी, तिचा मनु कोपला. ५९
साक्या.
बाल्यापासुनि तिला शशिकला शिक्षक मुख्यचि होती,
दीडवर्ष जाहलें कमलजा आली गुरु दुसरी ती,
विधवा होवोनी
पुरुषमत्सरी वाक्यें योजिलीं, मज गमलीं ना बरवीं; मोठा घोटाळा
श्लोक.
ह्मणाली दिनीं एक मातें सुता ती-

'पित्या, धन्य व्हा, स्वीकरा कार्य हातीं,

स्त्रियांचें हरा दास्य, त्यांलागिं दावा

. असा मार्ग की भोगिती त्या स्वजीवा. ६२

रम्या कांचनपूर नाम नगरी जी उत्तरेला वसे, 

तेथें जाउनि, पूर्ण निश्चय मनीं केला पित्या मी असे;
शाळा रूयुन्नतिकारणें निजमती स्थापीन, आशाभरें
स्त्रीवृंदा शिकवीन केविं अमुचें तें दास्य सारें हरे.' ६३

ऐशी स्थिती बघुनियां तनया - मनाची
लागे बहू मजशिं काळजि नित्य साची,