पान:इंदिरा.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१२
दिंडी.

 काय तुजसम नृपसुता कुण्या काळीं
 वाण नवरीची पडे अन्य कूळीं ?
 रे माझी ती सुता तुझ्या भागीं
 पडे जरि ना, तिज गणीं तरि अभागी. ५३

श्लोक.

कमलजा कमलाक्ष-सहोदरी,
शशिकला विधवा तशि दूसरी,

प्रिय सुमायसमा तिज रक्षिती,
जशिलतांप्रति रक्षित से क्षिती. ५४
गणेशापदींच्या जणूं रिद्धिसिद्धी,
जयां योजिलें म्यां सुतेची सुबुद्धी
मती वाढवाया यथायोग्य रीती,

समवयी, गुणि, प्रौढ, गुरुद्वय,
बहु सदा तनुजा गणि जें प्रिय;

निशिदिनीं तनये स्वसमागमें

भ्रमवि तें अपुल्या मतिच्या भ्र. ५६

रविस केतु जसा नभि लोपवी, 

शशिस राहुकळा थरकांपवी,
गतधवा ग्रहणापरि लागती;
ग्रह जणूं सम पुत्रिस ग्रासिती. ५७

पतिरहित अशा या पंडिता राजबाळे 

शिकविति अवघे हे दुर्मदें वेडचाळे;