पान:इंदिरा.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०७ आहा ! देहा कां हा उदयकाळ, ये न जवळ, अगे ! निवळ 'वरिन' हे म्हणें" ! ॥ ३ ॥ सखि तव० " १५५ उपसंहार. साकी. आतां उठला बहुतां दिवशीं अंतीं तो नृपपुत्र, होता तैसा पुनरपि झाला सुंदरतनु दृढगात्र; चिंता-क्लेश नुरे, । नृपतनयेची वृत्ति फिरे. १५६ श्लोक. प्रभाकराला शशि घालवीतो, हिमांशु जातां रवि तो उदेतो-- ह्मणा कसेंही, स्थिति अंतिं एक, जयीं निशा ये, सुखि होति लोक. १५७ तसें ह्मणा कीं नृपकन्यकेला हरी वराया नृपपुत्र तीला, तया कुमारा, अथवा हरी ती;- घडेल युग्माप्रति सौख्य अंतीं. १५८ - सुयुग्म ऐसें सुगुणावतारी परस्परां होइल सौख्यकारी; जरी स्त्रियां दाविल मार्ग योग्य, तरी तयांचें उघडेल भाग्य. १५९ अंजनीगीत. नृपतनया ती अंतीं बोले:- “आजवरी जें घडुनी आलें, रूपा तुमच्या ओळखियेलें म्यां हो पूर्णपणें. १६०